काही ठिकाणी कोरोना कमी होतोय तर काही ठिकाणी कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय.. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट आल्याने अनेक देशात कोरोना पुन्हा वाढतोय.. भारतातही कोरोना कमी होत असला तरी डेल्टा व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. त्यामुळे अनेक देश काळजी घेताना दिसतायत.. आता सुरक्षेचा उपाय म्हणून न्यूझीलंड सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेत, देशात कमीत कमी तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. हा निर्णय घेण्याचं कारण देशात सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. इतर देशांमध्ये काय सुरू आहे ते आपण पाहतो आहोत, कोरोना विरोधात लढा दिला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आपल्याकडे आता फक्त एकच संधी आहे, असं जेसिंडा म्हणाल्या. आणि त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली.
Ashwinvo
#lokmat #NewzealandLockdown #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat